News Flash

हेलिकॉप्टर घोटाळा: त्यागी बंधूंसोबत ‘कमिशन’ वाटून घेणार होतो; मध्यस्थ हॅश्केची कबुली

ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या करारात गुणात्मक बदल करण्यात येणार असल्याचे आधीपासूनच माहित असल्याचे तसेच त्यातून येणारे सात टक्के 'कमिशन' त्यागी बंधूंमध्ये वाटून घेण्याची

| December 3, 2013 12:20 pm

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला फिनमेकानिकाचा सल्लागार आणि मध्यस्थ गुईडो राल्फ हॅश्के याने इटलीच्या न्यायालयात खळबळजनक खुलासा केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या करारात गुणात्मक बदल करण्यात येणार असल्याचे आधीपासूनच माहित असल्याचे तसेच त्यातून येणारे सात टक्के ‘कमिशन’ त्यागी बंधूंमध्ये वाटून घेण्याची योजना होती. असा कबुलीनामा हॅश्केने दिला आहे.
त्यामुळे माजी हवाईदलप्रमुख एस.पी.त्यागी आणखी गोत्यात सापडले आहेत.
हेलिकॉप्टर लाचखोरीप्रकरणी माजी हवाई दलप्रमुख त्यागींची चौकशी
सोमवारी इटलीतील न्यायालयात हॅश्केने एका प्रश्नाच्या उत्तरात एस.पी.त्यागी यांच्या तीन बंधूंना ओळखत असल्याचे म्हटले. त्याचबरोबर ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीचे अधिकारी आणि एस.पी.त्यागी यांच्यात हेलिकॉप्टर खरेदीसाठी मध्यस्थाची भूमिका बजाविल्याचेही त्याने कबुल केले.
गेल्याच आठवड्यात हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी सुमारे ३,६०० कोटी रुपयांचे कंत्राट गमावण्याच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर कंत्राटाच्या अटींचे आपल्याकडून उल्लंघन झाल्याच्या आरोपाचे ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीने खंडन केले होते. यानंतर आता हॅश्केच्या कबुली जबाबानंतर ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीचेही पितळ उघड पडल्याचे दिसत आहे.
दुसरे बोफोर्स: त्यागी यांना ६-७ वेळा भेटल्याची मध्यस्थाची कबुली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:20 pm

Web Title: key middleman tells court in italy commission split with tyagi brothers
Next Stories
1 १९८४ शीखविरोधी दंगल: सज्जन कुमार यांची याचिका फेटाळली
2 श्रीमंतांच्या यादीतून सोनिया गांधींचे नाव हटविले
3 माओवाद्यांच्या हल्ल्यात सात पोलीस शहीद