06 July 2020

News Flash

पेशावर हल्ल्याचा कट रचणारा सद्दाम ठार

पेशावरमधील लष्कराच्या शाळेवरील हल्ल्याचा कट रचणाऱया तालिबानी म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

| December 26, 2014 04:07 am

पेशावरमधील लष्कराच्या शाळेवरील हल्ल्याचा कट रचणाऱया तालिबानी म्होरक्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलाकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत गुरूवारी गुंडी परिसरात सद्दाम हा पेशावर हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी ठार झाला असून त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात यश आल्याची माहिती ख्याबर एजन्सीचा राजकीय गुप्तहेर शाहब अली शाहने दिली आहे.
फोटो गॅलरी: काय घडले पेशावरमधील ‘त्या’ शाळेत?
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीपीपी) या संघटनेचा दहशतवादी सद्दाम यानेच पेशावरील येथील हल्ल्यासाठी सात दहशतवाद्यांना धाडले होते. या मूठभर दहशतवाद्यांनी १६ डिसेंबर रोजी पेशावर मधील ‘आर्मी पब्लिक स्कूल’वर केलेल्या हल्ल्यात १३२ विद्यार्थ्यांसह १४१ जण ठार, तर सव्वाशे जण जखमी झाले होते. एखाद्या निष्ठूर क्रूरकम्र्यालाही लाजवेल अशा पद्धतीने एकेका वर्गात शिरून निरागस, निष्पाप विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या वाढत्या उपद्रवाची प्रचिती देणाऱ्या या घटनेने अवघ्या जगाला सुन्न केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2014 4:07 am

Web Title: key planner of peshawar school massacre killed claim pakistan
टॅग Pakistan,Taliban
Next Stories
1 ख्रिसमस दिवशी ५८ ख्रिश्चनांची ‘घरवापसी’!
2 मोदींकडून नवाझ शरीफ, वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 रेल्वेचे खासगीकरण करणार नाही- नरेंद्र मोदी
Just Now!
X