News Flash

‘त्यावेळी’ येडियुरप्पा सरकार वाचवण्यासाठी के.जी.बोपय्यांनी घेतला होता पक्षपाती निर्णय

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी याआधी बोपय्या यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत.

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी याआधी बोपय्या यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. उद्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्यावेळी बोपय्या यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. बोपय्या यांची पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली नाही. यापूर्वी २००८ साली कर्नाटकात भाजपाचे सरकार आल्यानंतर ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते.

जगदीश शेट्टर त्यावेळी विधासभेचे अध्यक्ष होते. जगदीश शेट्टर यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी मंत्री बनवण्यात आले. मग बोपय्या विधानसभा अध्यक्ष बनले. विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. २०१० साली येडियुरप्पा सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला गेला त्यावेळी बोपय्या यांनी भाजपाचे ११ बंडखोर आमदार आणि पाच अपक्ष आमदारांना अपात्र ठरवले.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा निकाल रद्द केला व बोपय्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. बोपय्या विराजपेठमधून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले असले तरी ते सभागृहतील सर्व सर्वात वरिष्ठ आमदार नाहीत. काँग्रेस आमदार आर.व्ही.देशपांडे आणि बी.एस.येडियुरप्पा कर्नाटक विधानसभेतील सर्वात वरिष्ठ आमदार आहेत.

येडियुरप्पा मुख्यमंत्री असल्याने देशपांडे हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. देशपांडे आठवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. महाविद्यालयीन जीवनात भाजपाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय असलेले के.जी.बोपय्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 6:47 pm

Web Title: kg bopaiah controversial decision
Next Stories
1 भाजपा आमदार के.जी.बोपय्या कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
2 सत्तेसाठी कर’नाटक’; २४ तास आणि ४ शक्यता ठरवणार येडियुरप्पांचे भवितव्य
3 सीमेवर परिस्थिती चिघळणार! पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद, चार नागरीक ठार, १२ जखमी
Just Now!
X