News Flash

‘रोहिंग्यांच्या मदत पुरवण्यास बांगलादेश सरकार कमी पडले’

आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारवर दबाव आणला पाहिजे

फोटो सौजन्य-एएनआय

रोहिंग्यांना मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी बांगलादेश सरकार फार प्रयत्नशील आहे असे वाटत नाही. ते विस्थापित आहेत त्यांना लागेल ती मदत पुरवण्यात सरकार कमी पडल्याचे वक्तव्य बांगलादेशच्या विरोधी पक्ष नेत्या खालेदा झिया यांनी केले आहे. ‘द डेली स्टार’ने हे वृत्त छापल्याचे ‘एएनआय’ने म्हटले आहे. खालेदा झिया या बांगलादेशमधील नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत म्यानमारवर दबाव आणावा, असेही खालेदा झिया यांनी सुचवले आहे.

रोहिंग्यांना पुरवण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कमतरता जाणवू लागली आहे. कॉक्स बाजार येथील घटनेचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. म्यानमारमधील हिंसाचारामुळे २५ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास पावणेसहा लाख रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे, तर हजारो जण सीमारेषेवर ताटकळले असल्याचे संयुक्त राष्ट्राने आठवड्याभरापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र, या सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी बांगलादेश सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे खालेदा झिया यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2017 6:36 pm

Web Title: khaleda says bangladesh not doing enough for rohingyas
टॅग : Bangladesh
Next Stories
1 भारतातील ७६ टक्के एलईडी बल्ब वापरण्यास धोकादायक
2 भारत – इटलीमध्ये सहा करार; रेल्वे सुरक्षेबाबत करणार सहकार्य
3 प्रेयसीशी ब्रेकअप झाल्याने त्याने विमानात ठेवले धमकीचे पत्र?
Just Now!
X