News Flash

भारतातील मोठ्या राजकारण्याच्या भेटीसाठी अपहरण करण्यात आलं; मेहुल चोक्सीचा दावा

अपहरण करणाऱ्यांमध्ये बारबरा जराबिका, नरेंद्र सिंग आणि गुरमीत सिंग यांची नावे

८ ते १० जणांनी अँटिग्वा पोलीस असल्याचं सांगत अपहरण केल्याचा दावा

पंजाब नॅशनल बँकेत १३५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली डोमिनिका हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी गुरुवार पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यादरम्यान मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे अपहरण झाल्याचा दावा केला असून गंभीर आरोप केले आहेत.

“८ ते १० जणांनी अँटिग्वा पोलीस असल्याचं सांगत मला अमानुषपणे मारहाण केली. मी अजिबात शुद्धीत नव्हतो. त्यांनी माझा फोन, घड्याळ आणि पाकिट काढून घेतलं. मला लुटण्याचा हेतू नसल्याचं सांगत त्यांनी माझे पैसे परत केले असे मेहुल चोक्सीने अँटिग्वा पोलिसांकडे केलेल्या आरोपात म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

चोक्सीने ८ ते १० जणांपैकी काही नावे पोलिसांना दिली आहेत. यामध्ये बारबरा जराबिका आणि नरेंद्र सिंग आणि गुरमीत सिंग यांची नावे आहेत. याशिवाय त्याने काही अज्ञात लोकांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. ८ ते १० जणांनी अपहरण करुन डोमिनिकामध्ये आणले. एका उच्चपदस्थ “भारतीय राजकारण्या”ला भेटायला आणल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले असे चोक्सीने तक्रारीत म्हटले आहे. मेहुल चोक्सीच्या तक्रारीनंतर अँटिग्वा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मी कायदा पाळणारा माणूस, उपचारासाठी भारत सोडला; चोक्सीचा कोर्टात दावा

अपहरण सिद्ध झाले तर गंभीर बाब

अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीदेखील याप्रकरणी दखल घेतली आहे. अपहरण करणाऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. मेहुल चोक्सीचे आरोप खरे असल्याचे आढळून आले तर ही गंभीर बाब असल्याचे गंभीर बाब आहे ब्राऊन यांनी म्हटले आहे.चोक्सीने अँटिगा आणि बार्बुडाच्या रॉयल पोलीस दलात आपली तक्रार दाखल केली आहे असे ब्राऊन म्हणाले.

मेहुल चोक्सीचं अपहरण करुन भारतात आणण्याचा डाव होता; वकिलाचा गंभीर आरोप

५ तासांत डोमिनिकाला कसा पोहोचला कुटुंबियांचा सवाल

दरम्यान, मेहुल चोक्सीच्या कुटुंबाने डोमिनिका येथे पळून जाण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. २३ मे रोजी ५ वाजता संध्याकाळी चोक्सी अँटिग्वामध्ये होता. त्यामुळे ५ तासांमध्ये तो इतक्या लांब कसा जाऊ शकतो असा सवाल त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 6:01 pm

Web Title: kidnapped to visit big indian politicians mehul choksi claim abn 97
Next Stories
1 नाकावाटे देता येणाऱ्या लसीवर संशोधन सुरू – पंतप्रधान मोदी
2 Coronavirus : खासगी रुग्णालयांमधील लसींच्या मनमानी किंमतीवर मोदी सरकारचा चाप; जाहीर केला मोठा निर्णय
3 दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Just Now!
X