News Flash

VIDEO: कुमारस्वामींनी दिले एन्काऊंटरचे आदेश

या व्हिडिओत कुमारस्वामी फोनवर कोणाला तरी हत्येच्या आरोपींना मारण्यास सांगत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच कुमारस्वामींनी खुलासा केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन कुमारस्वामी अडचणीत आले आहेत. या व्हिडिओत कुमारस्वामी फोनवर कोणाला तरी हत्येच्या आरोपींना मारण्यास सांगत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच कुमारस्वामींनी खुलासा केला आहे. तो माझा आदेश नव्हता. त्यावेळी मी जरा जास्त भावूक झालो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे.

व्हायरल व्हिडिओत कुमारस्वामी म्हणत आहेत की, तो (जेडीएस नेते प्रकाश) खूप चांगला माणूस होता. त्या लोकांनी त्याला का मारले मला माहीत नाही. त्यांचा एन्काऊंटर करुन खात्मा करा. काहीच अडचण नाही.

या व्हिडिओवरुन प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर कुमारस्वामींनी खुलासा दिला आहे. ते म्हणाले की, तो माझा आदेश नव्हता. त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो. दुहेरी हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या त्या लोकांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी जेडीएस नेते प्रकाश यांची हत्या केली. अशा पद्धतीने ते जामिनाचा दुरुपयोग करत आहेत.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, जेडीएस नेते प्रकाश यांची सोमवारी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. ते कारमधून मद्दूरला जात होते. हल्लेखोरांनी त्यांची कार रोखून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले हेाते. जखमी अवस्थेत प्रकाश यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 10:14 am

Web Title: kill them mercilessly karnataka cm kumaraswamy instruction caught on video
Next Stories
1 ४१ तासांचा विमानप्रवास करुन भारतात परतणे अशक्य: चोक्सी
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 हिट अँड रन प्रकरण : आरोपीचं परदेशात हनिमूनला जाण्याचं स्वप्न भंगलं
Just Now!
X