उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना लष्कराच्या परेडसमोर बोलताना रडू कोसळलं. लष्कराचे आभार मानताना किम जोंग उन भावूक झाले. लष्कारातील जवानांनी देशासाठी मोठं बलिदान दिलं आहे असं म्हणताना किम जोंग उन यांना रडून आलं. काही काळापूर्वी देशात आलेल्या वादळापासून ते करोनाच्या संकटाशी तोंड देईपर्यंत अनेक प्रसंगांमध्ये सैनिकांनी लोकांना मदत करताना मोठं बलिदान दिल्याचं किम जोंग उन यांनी म्हटलं आहे. हुकूमशाह म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या किम जोंग उन यांच्यावर त्यानी देशात अवलंबलेल्या संकुचित विचारसरणीसाठी कायमच टीका होते. त्यांच्या धोरणांमुळेच उत्तर कोरियातील लोकांवर अनेक बंधने आली असून येथील जनतेला चांगली समाजव्यवस्था आणि स्वातंत्र्य देण्यात किम जोंग उन अपयशी ठरल्याचे टीका अनेकदा केली जाते. देशातील सत्ताधारी पक्षाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला. मात्र त्याचवेळी संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियामधील ४० टक्के जनतेला पूर आणि वादळांमुळे अन्न टंचाईचा समाना करावा लागला आहे.

किम जोंग उन हे त्यांच्या विचित्र निर्णयांसाठी जगभरामध्ये ओळखले जातात. त्यामुळेच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना किम जोंग उन यांना रडू आल्याने या गोष्टीची उत्तर कोरियाबरोबरच संपूर्ण जगामध्ये चर्चा आहे. करोना संकटाच्या कालावमध्ये आपण देशातील जनतेसोबत ठामपणे उभं राहू शकलो नाही असं सांगत किम जोंग उन यांनी जनतेची माफी मागितली आणि त्यांना रडू आलं, असं रॉयटर्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

किम जोंग उन यांना रडू आल्याची चर्चा ट्विटरवरही आहे. अनेकांनी ट्विटरवरुन सन २०२० मध्ये हे ही पहायला मिळालं असल्याचं म्हटलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

किम जोंग उन यांनी आपल्या पूर्वजांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा पाढाही वाचून दाखवला. “देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. महान कॉम्रेड किम इल सुंग आणि किम जोंग इल यांनी दाखवलेल्या मार्गाने आपली वाटचाल सुरु असून यामध्ये माझी साथ देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. मात्र मी केलेले प्रयत्न हे आपल्या देशातील लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत,” अशा शब्दांमध्ये किम जोंग उन यांनी आपली खंत बोलून दाखवली.