01 March 2021

News Flash

Coronavirus : किम जोंग-उनने दिले दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

उत्तर कोरियात करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा करण्यात आलाय

फोटो सौजन्य: एपी

उत्तर कोरियाने आपल्या देशामध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला आहे. कठोर निर्बंध लादल्यामुळे देशामध्ये करोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा कोरियाने केलं आहे. मात्र आता उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उनने शत्रू देशाकडून उत्तर कोरियात करोनाचा फैलाव केला जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच देशातील सीमांवरील सुरक्षा आणखीन वाढवण्यात आली असून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. देशांच्या सीमांजवळ बफर झोन तयार करण्यात आले आहेत.

उत्तर कोरियामधील प्रसारमाध्यमांनी एका पोलीस आदेशाच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार परवानगी न घेता या बफर झोनमध्ये फिरणाऱ्यांना कोणताही इशारा न देताना थेट गोळी घालण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्तर कोरियाच्या सीमेजवळ असणाऱ्या नद्यांमध्ये किंवा त्या नद्यांच्या किनाऱ्यांवर दिसणाऱ्या व्यक्तींना कोणतीही पूर्व सूचना न देता गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र कायद्याच्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशाच्या सीमेबाहेरील हद्दीतील व्यक्तींना कोणतीही पूर्व सूचना न देता, दिसताच गोळी मारण्याचा आदेश देणं हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन आहे.

आणखी वाचा- चिनी लशीविरोधात ब्राझीलमध्ये जोरदार आंदोलन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार, “बळ तसेच अग्नीबाणांचा उपयोग करण्याआधी असहिंकपद्धतीने प्रकरण हाताळण्यात यावे. मात्र शस्त्र वापरण्याची वेळ आळीच तर अशावेळी अधिकाऱ्यांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसार निर्णय घेणे गरजेचे असते.” संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा नियमानुसार दिसताच गोळी मारण्याचा आदेश स्वीकारुन गोळीबार करणाऱ्या सुरक्षारक्षकांबरोबरच त्यांना आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हत्येसाठी जबाबदार ठरवलं जातं.

आणखी वाचा- मोठी बातमी! करोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुख होम क्वारंटाइन

दुसरीकडे उत्तर कोरियाने बफर झोनमध्ये भूसुरुंग पेरल्याचे सांगितले जात आहे. सैन्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने रेडिओ फ्री एशियाशी बोलताना, “आम्ही सर्वोच्च आदेशानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासून उत्तर कोरिया आणि चीनच्या सीमेजवळच्या रयांगगंग प्रांतामध्ये भूसुरुंग पेरत आहोत,” असं सांगितलं. हे सर्व करण्यासाठी उत्तर कोरियाच्या लष्कराला १५ दिवसांहून कमी कालावधी लागला. मात्र यादरम्यान झालेल्या एका स्फोटामध्ये अनेक सैनिक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:34 pm

Web Title: kim jong un issues shoot to kill orders in brutal north korea coronavirus crackdown scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी – हिंदुस्थान अवाम मोर्चाचे मोदींना पत्र
2 गरज पडल्यास भाजपालाही पाठिंबा देऊ – मायावती
3 स्वत: विकलेली कार Duplicate Key चा वापर करुन चोरायचा अन् पुन्हा विकायचा
Just Now!
X