करोना व्हायरसची माहिती लपवल्याबद्दल आज जगभरातून चीनववर टीका सुरु आहे. जगातील अनेक देश आज चीनच्या विरोधात आहेत. पण उत्तर कोरियाला मात्र तसे वाटत नाही. उलट उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याबद्दल चीनचे कौतुक केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना एक व्यक्तीगत संदेश पाठवला आहे. त्यात करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याबद्दल जिनपिंग यांचे त्यांनी कौतुक केले आहे. चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र आहे. उत्तर कोरियाचा व्यापार चीनवर अवलंबून आहे.

prakash mahajan on Raj thackeray
मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देतायत? प्रकाश महाजन म्हणाले, “राज ठाकरेंमुळे आमची…”
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!

चीन ही एकप्रकारे उत्तर कोरियाची लाइफलाइनच आहे. त्यांचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे मागच्या काही महिन्यात चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठया प्रमाणावर कमी झाला होता.

चीनने करोना व्हायरसच्या फैलावाची वेळीच माहिती दिली नाही असा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच कल्पना दिली असती तर करोनाचा फैलाव रोखता आला असता असे अनेक देशांना वाटते. आज करोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला असून अर्थचक्र ठप्प झाले आहे. बेरोजगारीचे मोठे संकट जगासमोर आहे. पण या परिस्थितीतही उत्तर कोरिया, पाकिस्तान हे देश चीनची पाठ थोपटत आहेत.