उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरच्या शिखर बैठकीसाठी व्लादिवोस्तोक येथे दाखल झाले आहेत. पुतिन यांच्यासमवेत त्यांची पहिलीच शिखर बैठक होत असून बुधवारी त्यांचे येथे आगमन झाले. मात्र किम यांचे रशियामधील आगमन वेगळ्याच कारणामुळे सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.

किम यांची चिलखती रेल्वे दुपारी झारच्या काळातील व्हादिवोस्तोक रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. यावेळी किम ज्या दरवाजातून उतरणार होते त्यासमोर रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. मात्र जेथे रेड कार्पेट अंथरले होते तेथून थोड्या पुढे जाऊन किम यांचा डब्बा थांबला. त्यामुळे किम यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे असलेले सेवक गोंळले. बराच वेळ किम ट्रेनमधून बाहेर आले नाही. शेवटी किम यांना अंथरलेल्या कार्पेटवर उतरता यावे म्हणून चक्क रेल्वेच काही अंतर मागे घेण्यात आली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकांनी किम यांच्या या स्वागताची खिल्ली उडवली आहे. पाहुयात याच घटनेसंदर्भातील काही व्हायरल ट्विटस

इगो

यांचा आळस पाहून यांच्या शस्त्रांचीही भिती वाटत नाही

अश्मयुग

चालकाला फाशी?

रेड कार्पेटशिवाय चालणार नाही

ब्रेकिंग येणार अशी?

दरम्यान पुतिन यांच्यासमवेत किम यांची ही पहिलीच बैठक असून त्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हनोई येथे फेब्रुवारीत झालेल्या बैठकीतील वाटाघाटी व त्यातील अपयशाची कारणे याबाबत चर्चा करणार आहेत. रशियामध्ये किम यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. आपली ही भेट यशस्वी होईल अशी आशा किम यांनी रशियन दूरचित्रवाणीशी बोलताना व्यक्त केली. त्यांची रेल्वे रशियाची हद्द ओलांडून खासान शहरात प्रवेश करीत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. कोरियन द्वीपकल्पातील प्रश्न सोडवण्यासाठी व द्विपक्षीय संबंधाबाबत आपण ठोस चर्चा करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किम हे शुक्रवारीही व्लादिवोस्तोक येथे मुक्काम करणार असून त्या वेळी ते बॅले कार्यक्रमास उपस्थित राहून मत्स्यालय पाहण्यासाठी जाणार आहेत. पुतिन यांनी किम यांना अनेक वेळा निमंत्रण दिले होते, त्यानंतर आता ही भेट होत आहे. मार्च २०१८ पासून किम यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासमवेत चार, तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्यासमवेत तीन, तर ट्रम्प याच्यासमवेत दोन व व्हिएतनाम अध्यक्षांबरोबर एक शिखर बैठक घेतली आहे.