एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या प्रचारासाठी दिल्लीत एकामागून एक सभा घेत असताना दुसरीकडे किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख नरेंद्र टंडन यांनीच सोमवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यानंतर सोमवारी दुपारी लगेचच त्यांनी आपला राजीनामा मागेही घेतला. मात्र, या घटनेवरून भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले.
अपप्रचार !
किरण बेदी यांच्या वैयक्तिक कर्मचाऱयांनी अवमानास्पद वागणूक दिल्यामुळेच आपण राजीनामा देत असल्याचे टंडन यांनी म्हटले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लिहिलेल्या राजीनामापत्रात त्यांनी बेदी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडण्यात आल्यामुळे आपण निराश झाल्याचे लिहिले. गेल्या ३० वर्षांपासून आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत. मात्र, बेदी यांच्या वैयक्तिक कर्मचाऱयांनी दिलेल्या वागणुकीमुळे आपला अवमान झाला आहे, असे म्हटले होते.
दिल्लीची लढाई आणि दोन शक्यता
मात्र, सोमवारी दुपारी टंडन यांनी आपल्या राजीनामा पत्राबद्दल खेद व्यक्त करीत आपला निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. किरण बेदी यांच्या प्रचारसभा आणि प्रचारफेऱया निश्चित करण्याचे काम टंडन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.