माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे निलंबीत खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल. काँग्रेसप्रवेशाबाबतची माहिती किर्ती आझाद यांनी ट्विट करत दिली आहे.

१८ फेब्रुवारी रोजी किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काल पुलवामा येथे झालेल्या हल्यामुळे किर्ती आझाद यांना काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडला आहे. पुलवामा येथे झालेल्य हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानामुळे काँग्रेस पक्षातील प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे.  देशापेक्षा कोणताही व्यक्ती किंवा पक्ष मोठा  नाही, असे किर्ती आझाद म्हणाले आहेत.

किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांच्यावर किर्ती आझाद यांनी डीडीसीएमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपाने किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले होते.

 

कोण आहेत किर्ती आझाद?
बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे किर्ती आझाद सुपुत्र आहे. १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सरुवात १९९३ मध्ये दिल्लीतील गोल मार्केटतील विधानसभा निवडणुकीपासून केली होती. त्यानंतर ते १९९८ मध्ये बिहारकडे वळाले. तिथे त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. मात्र १९९८ नंतर त्यांना विजयासाठी 2009 सालापर्यंत वाट पाहावी लागली.