News Flash

शेतकरी आंदोलन : “राकेश टिकैत हे फस्ट्रेटेड नेते, हरयाणामधील शेतकरी समाधानी आहे”

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवण्यात आलेत"

(फोटो सौजन्य: पीटीआय)

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांना टोला लगावला आहे. खट्टर यांनी टिकैत हे फस्ट्रेटेड नेते असल्याचा टोमणा खट्टर यांनी मारला आहे. दिल्लीच्या सीमांजवळ सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा, असं खट्टर यांनी म्हटलं आहे. मात्र काही काही नेते फस्ट्रेटेड आहेत. त्या नेत्यांची इच्छा काहीतरी वेगळीच असल्याने ते शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलत नाहीयत, असा आरोप खट्टर यांनी केला. त्याचप्रमाणे टिकैत यांना जर शेतकऱ्यांना समजवायचं असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा, असंही खट्टर यांनी म्हटलं आहे.

हरयाणामधील शेतकरी समाधानी असल्याचा दावा मुख्यमंत्री खट्टर यांनी केलीय. काही लोकांचा गैरसमज झाला असून आम्ही लवकरच त्यांना यासंदर्भात माहिती देऊन त्यांचा विरोध शांत करु, असा विश्वास खट्टर यांनी व्यक्त केलाय. हरयाणामधील शेतकऱ्यांसमोर कोणत्याही अडचणी नाहीयत, असंही खट्टर म्हणाले आहेत. काही नेते स्वार्थी असून ते स्वत:च्या हितासाठी शेतकऱ्यांना पुढे करत आहेत. गुरनाम सिंह चढुनी असो किंवा राकेश टिकैत असो दोघेही आपल्या खासगी स्वार्थीसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप खट्टर यांनी केला आहे.

आणखी वाचा- २६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर दीप सिद्धूने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घालवली रात्र

संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो हे सांगताना पंतप्रधानांच्या वक्तव्याचा संदर्भ खट्टर यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच यासंदर्भात संपूर्ण विचार करुन आपले मत मांडले पाहिजे, असंही खट्टर म्हणाले. मंगळवारी चंदिगडमध्ये एका बैठकीनंतर खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं.

आणखी वाचा- Farmers Protest: अधिकाऱ्यांवर कारवाईच्या इशाऱ्यानंतर ट्विटरकडून ७०२ अकाउंट्स बंद

दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेसंदर्भात बोलताना खट्टर यांनी दिल्ली पोलिसांनी ज्या लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे त्यापैकी काहींना अठक करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. तसेच उरलेल्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असंही खट्टर म्हणालेत. तसेच राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणणार असल्याचेही खट्टर यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 9:52 am

Web Title: kisan andolan rakesh tikait is frustrated leader says haryana cm manohar lal khattar scsg 91
Next Stories
1 Farmers Protest: अधिकाऱ्यांवर कारवाईच्या इशाऱ्यानंतर ट्विटरकडून ७०२ अकाउंट्स बंद
2 २६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर दीप सिद्धूने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घालवली रात्र
3 अद्यापही १७० बेपत्ताच!
Just Now!
X