News Flash

‘किस ऑफ लव्ह’च्या आयोजक जोडप्याला सेक्स रॅकेट प्रकरणी अटक

राहुल पसुपालन आणि रश्मी नायर यांना सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली केरळ पोलिसांनी अटक केली आहे.

'किस ऑफ लव्ह' या मोहिमेचे आयोजक राहुल पसुपालन आणि रश्मी नायर.

‘किस ऑफ लव्ह’ या मोहिमेचे आयोजक राहुल पसुपालन आणि रश्मी नायर यांना सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली केरळ पोलिसांनी अटक केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जोडपं सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सायबर सेलने सापळा रचला होता. या सापळ्यात राहुल आणि रश्मी यांच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

स्वत:ला नैतिकतेचे संरक्षक म्हणवून घेणाऱयांच्या दादागिरीविरोधात गेल्या वर्षी राहुल आणि रश्मीने ‘किस ऑफ लव्ह’ मोहिम सुरू केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दिल्लीसह अनेक शहरात ही मोहिम चालवण्यात आली होती.

कोचीमधील एका कॅफेत एका जोडप्याने एकमेकांना किस केले होते. याविरोधात एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कॅफेची तोडफोड केली होती. तसेच प्रेमी युगुलाला देखील मारहाण केली होती. यातूनच ‘किस ऑफ लव्ह’ या मोहिमेचा जन्म झाला. मोठ्या संख्येने तरुणाई यात सामील झाली. काही ठिकाणी आंदोलनेही झाली. फेसबुक पेज तयार करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून प्रेमी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी उघडपणे चुंबन घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 6:39 pm

Web Title: kiss of love protest leaders held for running online sex racket in kerala
Next Stories
1 मुंबईतील २६/११च्या खटल्यात डेव्हिड हेडलीही आरोपी, कोर्टाकडून समन्स जारी
2 नितीश कुमार यांच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदींना आमंत्रण
3 रॉबर्ट वद्रा ६ महिन्यांत तुरुंगात असतील – हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Just Now!
X