30 November 2020

News Flash

फायर अँड फर्गेट: जाणून घ्या ‘राफेल’मधील घातक स्काल्प मिसाइलबद्दल

..आता भारतातूनच करता येईल बालाकोट सारखा एअर स्ट्राइक

स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करते. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडून मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात. हे विमान बनवताना शक्य तितके स्टेल्थ तंत्रज्ञान वापरुन शत्रूच्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)

येणार, येणार म्हणून मागच्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेले राफेल फायटर विमान अखेर भारतात दाखल झाले आहे. हवाई दलाच्या अंबाला बेसवर राफेल विमानांनी लँडिंग केले. ही फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहेत. याआधी भारतीय हवाई दलाकडे इतकी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली विमाने नव्हती. राफेलची शस्त्रास्त्रे खासकरुन मिसाइल सिस्टिम या विमानाला घातक बनवते.

जाणून घेऊया राफेलमधील स्काल्प मिसाइलबद्दल

– स्काल्प हे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाइल आहे. ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. या मिसाइलमुळे इंडियन एअर फोर्सला शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

– राफेलच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या वैमानिकाला आता लक्ष्याच्या जवळ जाऊन हल्ला करण्याची आवश्यकता नाही. तो दूर अंतरावरुन लक्ष्यावर मिसाइल डागू शकतो. त्यामुळेच बालाकोट सारखा एअर स्ट्राइक करण्यासाठी आता पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याची गरज नाही. आपण भारतात राहूनच पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ नष्ट करु शकतो. त्यामुळे सरकारमधील नेते आणि एअर फोर्सचे अधिकारी राफेल युद्धाच्याकाळात गेमचेंजर ठरेल असे सांगत आहेत.

– राफेलच्या या क्षमतेमुळेच समीकरणं बदलणार असून हवाई शक्तीमध्ये भारत चीन-पाकिस्तानपेक्षा सरस असेल. “स्काल्प मिसाइलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. शत्रुच्या प्रदेशातील पुल, रेलरोड, ऊर्जा प्रकल्प, धावपट्टी, बंकरही उद्धवस्त करु शकतो. जमिनीलगत उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे स्काल्प शत्रुच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊ शकते” असे हे मिसाइल बनवणाऱ्या MBDA च्या अधिकाऱ्याने सांगितले.

– स्काल्प मिसाइल यूके एअर फोर्स आणि फ्रेंच एअर फोर्स वापरते. खाडी युद्धात हे मिसाइल वापरण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:35 pm

Web Title: know about rafaels scalp missile dmp 82
Next Stories
1 VIDEO: फ्रान्सचं उत्तम इंजिनिअरींग कौशल्य, सिक्रेट वेपन ‘राफेल’
2 २२ वर्षांनी हवाई दलाला मिळालेल्या जेटचा असा होता प्रवास
3 “राफेलचं भारतात स्वागत; आज प्रत्येक भारतीयाने हे प्रश्न विचारायला हवेत”
Just Now!
X