13 December 2017

News Flash

कोलकात्यात भीषण आगीत १९ जणांचा बळी

कोलकाता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सिलडा भागातील एका गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा बळी

कोलकाता | Updated: February 27, 2013 10:41 AM

कोलकाता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सिलडा भागातील एका गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा बळी गेला आणि चार जण जखमी झाले आहेत. गोडाऊन आणि कार्यालये असलेल्या या इमारतीला बुधवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. तिथे राहात असलेल्या व्यक्ती झोपेत असतानाच आगीच्या कचाट्यात सापडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी १५ जणांची इमारतीमधून सुटका केली. आगीमुळे जखमी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालचे मंत्री जावेद खान म्हणाले, सहा जणांना बेशुद्ध अवस्थेत इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. आणखी काही व्यक्ती आतमध्ये अडकल्या आहेत का, याची चाचपणी सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी २६ बंब कार्यरत आहेत. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले.

First Published on February 27, 2013 10:41 am

Web Title: kolkata 19 killed 4 injured in major fire at sealdah
टॅग Fire,Kolkata