News Flash

कोलकाता : २२ वर्षीय तरुणीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् तेल ओतून दिलं पेटवून

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद

कोलकाता : २२ वर्षीय तरुणीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् तेल ओतून दिलं पेटवून
प्रातिनिधिक फोटो

पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता शहरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका २२ वर्षीय तरुणीने आपल्याच वडिलांची हत्या केलीय. या तरुणीने आपल्या वडिलांना एका हॉटेलमध्ये खाऊ घातलं त्यानंतर त्यांना दारु पाजली. नंतर या मुलीने तिच्या वडिलांना आग लावून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पियाली नावाच्या या तरुणीने रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिने त्यांना दारु पाजली. नंतर दोघेही स्ट्रड रोडवरील चडपाल घाट येथे फेरफटका मारण्यासाठी गेले. तिथेच दारुच्या नशेत असणाऱ्या ५६ वर्षीय बिश्वनाथ फुटपाथवर झोपी गेले. त्यानंतर पियालीने त्यांच्या अंगावर कच्चं तेल टाकून त्यांना आग लावून दिली. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याने पियालीने आपला गुन्हा कबुल केलाय. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पियालीची चौकशी केली असता या पियालीने स्वत:च्याच बापाला अशाप्रकारे काम मारलं याबद्दलचा धक्कादायक खुलासा केलाय. पियालीने दिलेल्या माहितीनुसार ती लहान असतानाच तिची आई वारली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. या तरुणीचं लग्न झाल्यानंतरच तिच्यावर वडिलांकडून होणार अत्याचार होणं थांबलं. मात्र लग्नानंतर घरगुती वादांमुळे ही तरुणी पुन्हा माहेरी रहायला आली तेव्हा तिचे वडील पुन्हा तिचं लैंगिक शोषण करु लागले.  म्हणूनच आपण वडिलांची हत्या केल्याची कबुली पियालीने दिलीय. वडिलांना दारु पिण्याचं व्यसन असल्याने ते आपल्यासोबत येतील याची खात्री असल्याने आपण असा कट रचल्याचंही तिने आपल्या कबुली जबाबामध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- मध्य प्रदेश : ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

पोलीस सध्या पियालीने केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहत आहेत. पियालीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयाने तिला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेनेच वडिलांची हत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे तिच्याच एका नातेवाईकाने केली होती. त्याच तक्रारीच्या आधारे तपास सुरु झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 10:10 am

Web Title: kolkata 22 year old woman gets dad drunk burns him alive scsg 91
Next Stories
1 मध्य प्रदेश : ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
2 सुपर मार्केटमध्ये अंदाधूंद गोळीबार; एका पोलिसासह १० जणांचा मृत्यू
3 “भारतीय संस्कृतीनुसार फाटके कपडे घालणं म्हणजे अपशकुन असतो”
Just Now!
X