News Flash

विश्वासदर्शक ठराव गमवल्यानंतरही केपी शर्मा ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी

सत्ता स्थापनेचा दावा करण्यात विरोधकांना अपयश

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना तीन दिवसापूर्वी संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयश आलं होतं. मात्र तरीही त्यांची वर्णी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी लागली आहे. शुक्रवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. विरोधी पक्षांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्याने केपी शर्मा ओली यांची पुन्हा एका पंतप्रधानपदी वर्णी लागणी आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी सीपीएन यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे.

विरोधी पक्षांना बहुमत सिद्ध करत नवं सरकार स्थापन करण्यासाठी गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. मात्र नियोजित वेळेत विरोधी पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे घटनेच्या अनुच्छेद ७६ (३) अंतर्गत ओली यांना पुन्हा एकदा सरकार स्थापनेची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही ३० दिवसाच्या आत विश्वादर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे गुजरातमध्ये ४५+ नागरिकांचं लसीकऱण थांबलं…

नेपाळच्या संसदेत एकूण २७१ खासदार आहेत. त्यापैकी ओलीच्या यांच्या सीपीएल यूएमएल या पक्षाकडे १२१ जागा आहेत. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १३६ जागांची आवश्यकता आहे. तीन दिवसापूर्वी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी ओली यांना फक्त ९३ मतं पडली होती. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावाविरोधात १२४ मतं पडली होती. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे कलम १०० (३) अंतर्गत त्यांचं पंतप्रधानपद गेलं होतं.

धक्कादायक! सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकलं

केपी शर्मा ओली यापूर्वी ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २१० पर्यंत आणि १५ फेब्रुवारी २०१८ ते १३ मे २०२१ पर्यंत पंतप्रधानपदी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 4:14 pm

Web Title: kp sharma oli reappoint as a nepal prime minister rmt 84
टॅग : Nepal
Next Stories
1 केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे गुजरातमध्ये ४५+ नागरिकांचं लसीकऱण थांबलं…
2 तुरुंगातील करोना रुग्णांची सेवा करायचीय, परवानगी द्या; तिहारमधील अल-कायदाच्या दहशतवाद्याची याचिका
3 Oxygen Crisis: करोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार
Just Now!
X