कुडनकुलम प्रकल्पाच्या तसेच प्रकल्पबाधितांच्या सुरक्षेबाबत तब्बल ६० शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली असून सुरक्षेशी संबंधित बाबींचा नव्याने अभ्यास करण्याची गरज या शास्त्रज्ञांनी अधोरेखित केली आहे.
कुटनकुलम येथील आण्विक उर्जा प्रकल्पाच्या बांधणीमध्ये दुय्यम प्रतीचे साहित्य वापरले गेले असल्याची शक्यता वर्तवित सुमारे ६० शास्त्रज्ञांनी तामिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालय तसेच अणूउर्जा विभागाच्या सचिवांनाही पाठविली गेली आहे.