परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांची माहिती

पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क करण्यासाठी प्रयत्न चालू असून, त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले. भारताने जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्कासाठी १३ वेळा पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आली.

AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Raj Thackeray
“राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न”; विजय वडेट्टीवार यांचा टोला
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार

वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की जाधव यांच्याशी दूतावास संपर्कासाठी आम्ही तेरा वेळा प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. आता आम्ही त्यांच्याशी संपर्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने १० एप्रिलला जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती व त्यासाठी गुप्त सुनावणी घेऊन त्यांच्यावर बलुचिस्तान व कराचीत हेरगिरी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला. व्हिएन्ना करारानुसार जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या नागरिकाला पकडले तर त्याच्याशी राजनैतिक मार्गाने संपर्क उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. भारताने काल असे म्हटले होते, की जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर अपील करण्यात येईल. फक्त त्याआधी पाकिस्तानने त्यांच्यावरील आरोपपत्र व निकालपत्राची प्रत द्यावी व राजनैतिक पातळीवर संपर्कही प्रस्थापित करून द्यावा. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना युवकांनी धक्काबुक्की केल्याच्या व्हिडिओबाबत सिंग यांनी सांगितले, की या व्हिडिओ मी पाहिलेले नाहीत व त्यावर काही माहिती नसताना आपण प्रतिक्रिया देणार नाही. व्हेटरन्स इंडिया या गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.