News Flash

पक्षाच्या चुकांवर गप्प बसणार नाही; कुमार विश्वास यांनी केजरीवालांना सुनावले

कार्यकर्त्यांना लाथ मारु नका

आपचे नेते कुमार विश्वास आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. (संग्रहित)

दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षात निर्माण झालेला वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. मला पक्षात कोणतेही पद नको, मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. पण मी पक्षातील चुकांवर गप्प बसू शकत नाही अशा शब्दात कुमार विश्वास यांनी पक्षनेतृत्वाला खडे बोल सुनावले आहेत.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात दुफळी माजली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्वास हे संघ आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुमार विश्वास यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना कुमार विश्वास भावूकही झाले होते. अमानतुल्ला यांनी माझ्यावर आरोप केले. पण असे आरोप त्यांनी केजरीवाल किंवा सिसोदिया यांच्यावर केले असते तर आत्तापर्यंत त्यांना पक्षातून बाहेर काढले असते असा दावा कुमार विश्वास यांनी केला. माझ्याविरोधात कट रचण्यात आला असून मी मुख्यमंत्री होण्यासाठी आलो नाही. मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. पक्षातील चुकांवर मी गप्प बसणार नाही असे त्यांनी पक्षनेतृत्वाला सुनावले आहे.

केजरीवाल, सिसोदिया आणि मी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचे स्वप्न बघितले होते. एका आमदाराने माझ्यावर आरोप केले. पण असे आरोप त्याने केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर केले असते तर त्याला १० मिनिटांमध्ये पक्षातून बाहेर काढण्यात आले असते असे ते म्हणालेत. पण अमानतुल्ला हे फक्त मुखवटा आहे असे सूचक विधानही त्यांनी केले. लागोपाठ सहा वेळा पराभव झाल्यानंतर मी तिकिट वाटपावर प्रश्न उपस्थित केले होते, कदाचित मी जखमेवर बोट ठेवल्याने हा वाद निर्माण झाला असे कुमार विश्वास यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना लाथ मारु नका, त्यांनी नोकरी सोडून तुमच्यासाठी काम केले अशी आठवणही त्यांनी केजरीवालांना करुन दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 6:05 pm

Web Title: kumar vishwas gets emotional says wont join aap for post arvind kejriwal manish sisodia
Next Stories
1 आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बँका!; ६५ हजार लुटून पोबारा
2 ‘रिलायन्स जिओ’ आणणार दीड हजाराचा 4G हँडसेट
3 जाणून घ्या, भारतीय जवानांचा जीव घेणाऱ्या ‘बॅट’बद्दल
Just Now!
X