24 September 2020

News Flash

“इम्रान खान, तुम्ही कटोरा घेऊन जगभरात भीक मागायला सुरुवात करा”

इम्रान खान यांना कळकळीचा सल्ला

काश्मीरला विशेष तरतूद देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान व भारताचे संबंध आता आणखीनच ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताविरोधात आक्षेपार्ह विधाने करत आहेत. अलिकडेच त्यांनी जोपर्यंत भारत काश्मीरमधील नागरीकांवरील अन्याय थांबवत नाही तो पर्यंत पाकिस्तान भारताशी कुठल्याच प्रकारची चर्चा करणार नाही अशा आशयाचे ट्विट केले होते. या त्यांच्या ट्विटला कुमार विश्वास यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी इम्रान खान यांना “कटोरा उचला व जगभरात भीक मागा” हा सल्ला दिला आहे.

भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यामुळे सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थीती फारच बिकट झाली आहे. अगदी रोजच्या वापरातील दूध, भाज्या, अन्नधान्य यांचे भाव पाकिस्तानात गगनाला भिडले आहेत. तसेच सातत्याने सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे जगभरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. परिणामी पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीला आता खिळ बसली आहे. अशा बिकट परिस्थीतीतही पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासारख्या सक्षम देशाला आव्हात देत असल्यामुळे कुमार विश्वास यांनी पाकिस्तानला भिक मागून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 2:45 pm

Web Title: kumar vishwas imran khan pakistan economy mppg 94
Next Stories
1 कार खरेदीकडे ‘नवतरुणांचा’ कल का कमी? ‘मारुती’च्या अध्यक्षांनी सांगितलं कारण
2 प्रियकाराने केला बलात्कार आईने शूट केला व्हिडिओ; असा झाला प्रकरणाचा भांडाफोड
3 राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती
Just Now!
X