News Flash

हत्तीणीला ठार करणाऱ्यांची संस्कृती कोणती? कुमार विश्वास यांचा संतापजनक प्रश्न

कुमार विश्वास यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला घटनेचा निषेध

केरळच्या पल्लकडमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने जो मृत्यू झाला त्या घटनेचा निषेध देशभरात होतो आहे. अशात कवी असलेले डॉ. कुमार विश्वास यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे.

काय म्हणाले आहेत कुमार विश्वास?

I can’t Breathe.. I can’t Breathe
मी हे दुःख सहन करु शकत नाही. मी याआधीही म्हटलं आहे की जोपर्यंत धर्म-जात-देश-प्रदेश-दल-आस्था यांच्या नावे माणसं घृणास्पद कृत्यं करत आहेत. वैमनस्य आणि हिंसेची बीजं रोवत आहेत. तोपर्यंत विष असलेली नवी पिढी जन्म घेईल. कोण आहेत ते युवक ज्यांनी महादेवाच्या पत्नीचं नाव असलेल्या उमा नावाच्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. तिची हत्या केली. त्या हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं? इतक्या घृणास्पद पद्धतीने एका हत्तीणीला ठार करण्यात आलं. ती हत्तीण वेदनेने विव्हळत होती. मात्र त्या अवस्थेतही तिने कुणाला इजा केली नाही. तिचा जबडा तुटून पडला, तोंड उडालं. तिच्या गर्भात असणारा जीव मरुन गेला. ती हत्तीण पाण्यात बसून बिचारी रडत मृत्यूला सामोरी गेली. भारतीयांमध्ये हे कोणतं विष पेरलं गेलं आहे? तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती? या लोकांनी काय वाचलं आहे? ते कोणासोबत बसतात?

नेमकं काय घडलं?

केरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार घडला. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला आहे. केरळच्या मल्लपूरम भागात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या मोहन क्रिश्नन या अधिकाऱ्याने फेसबूक पेजवरुन हा प्रसंग उजेडात आणला.

आणखी वाचा- केरळमध्ये अजून एका हत्तीणीची त्याच क्रुरतेने हत्या झाल्याचा संशय

“हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 4:31 pm

Web Title: kumar vishwas pours his heart over the killing of pregnant elephant uma in kerala scj 81
Next Stories
1 दिल्लीनं मुंबईला टाकलं मागे; बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाइनची सक्ती
2 सायकल दिनी अॅटलस फॅक्टरी बंद, हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार
3 “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला”; राजीव बजाज यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Just Now!
X