News Flash

कुंभमेळा २०१९ : म्हणून ४१ सेकंदांहून जास्त वेळ मारता येणार नाही डुबकी

या संगमामध्ये एक डुबकी मारण्यासाठी यात्रेकरु कित्येक मैल प्रवास करुन याठिकाणी येतात.

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. या भव्यदिव्या सोहळ्याला जगभरातून लाखो लोक उपस्थित राहतात. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या लोकांचे नियोजन करणे हे येथील व्यवस्थापनापुढील एक मोठे आव्हान असते. या दरम्यान गर्दीमुळे काही दुर्घटना घडल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र आता असे होऊ नये यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी उपस्थितांना आवाहन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना पोलिस महानिरीक्षक ओ.पी सिंह म्हणाले, कुंभमेळ्यादरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमात स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. या संगमामध्ये एक डुबकी मारण्यासाठी यात्रेकरु कित्येक मैल प्रवास करुन याठिकाणी येतात.

या संगमात स्नान करण्याला बरेच धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे लाखो यात्रेकरुंना या संगमात स्नान करण्यासाठी येतात. परंतु एकावेळी जास्त जण आले तर याठिकाणी चेंगराचंगरी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या संगमात डुबकी मारण्यासाठी ४१ सेकंदांची वेळ नक्की करण्यात आली आहे. याहून जास्त वेळ कोणीही या नदीमध्ये स्नान करु शकणार नाही. त्या लोकांना ४१ सेकंदामध्ये त्वरीत बाहेर काढले जाणार आहे. हा कुंभमेळा सुरक्षितपणे कोणत्याही अपघाताविना पार पडावा यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. याशिवायही ट्रॅफीकच्यादृष्टीनेही काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा सर्व सोहळा योग्य पद्धतीने पार पडावा यासाठी पोलिस आणि इतर यंत्रणा अतिशय काटेकोर प्रयत्न करत असून वेळप्रसंगी इतर राज्यातील पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 3:56 pm

Web Title: kumbh meal 2019 bathe in river for 41 seconds up police rule to avoid kumbh stampede
Next Stories
1 भाजपाचा हा नेता पत्नीलाही ‘बहनजी’ म्हणत मत मागायचा, शत्रुघ्न सिन्हांनी सांगितला किस्सा
2 ‘दंगल घडवून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणाऱ्या नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे’
3 उत्तर प्रदेशची लढाई जिंकण्यासाठी भाजपाची ‘वोट कटवा’ पक्षांवर नजर
Just Now!
X