करोना व्हायरसमुळे कुवेतने भारताबरोबरची हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे भारतातही करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात आतापर्यंत ३१ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कुवेतन भारतासह अन्य काही देशांबरोबरची हवाई वाहतूक आठवड्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्याभरात कुवेतच्या एकाही विमानाचे भारतात लँडिंग होणार नाही तसेच भारतातून एकही विमान कुवेतला जाणार नाही.

कुवेतने बांगलादेश, फिलीपाईन्स, भारत, श्रीलंका, सीरिया, लेबनॉन, इजिप्त या देशांबरोबर हवाई वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह या सात देशातील नागरिकांना मागच्या दोन आठवडयांपासून कुवेतमध्ये प्रवेशबंदी आहे. जगभरात एकलाखापेक्षा जास्त लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत करोना विषाणूमुळे ३५०० नागरीकांचा मृत्यू झाला आहे. चीनबाहेर २०,२९० जणांना करोनाची लागण झाली आहे.