अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम राष्ट्रांना अमेरिकेत प्रवेशबंदी जाहीर केल्यानंतर आता कुवेतनेही त्याच पावलावर पाऊल ठेवताना पाकिस्तानसह सिरीया, इराक, अफगाणिस्तान आणि इराण या मुस्लिम राष्ट्रांतील निर्वासितांना व्हिसा नाकारला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवडय़ात शुक्रवारी सात मुस्लिम राष्ट्रांवर प्रवेशबंदीचा निर्णय जाहीर केला होता. बंदी घातलेल्या पाच राष्ट्रांतील निर्वासित नागरिकांना व्हिसासाठी अर्ज करू नये, असे कुवेतने म्हटले आहे. दहशतवादी कारवायांच्या भीतीमुळे ही खबरदारी घेण्यात आल्याचे कुवेतमधील प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांनी सिरिया, इराण, इराक, सुदान, लिबिया, सोमालिया, येमेन या देशांतील नागरिकांवर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका करण्यात येत असतानाच आता कुवेतनेही त्याचप्रकारे मुस्लिम राष्ट्रांतील नागरिकांना विरोध दर्शविला आहे. अमेरिकेच्याही आधी कुवेतने सिरीयातील नागरिकांवर बंदी घातली होती. कुवेतने २०११मध्ये सिरीयातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. शिया दहशतवाद्यांनी २०१५मध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात कुवेतमधील २७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेच या पाच मुस्लिम राष्ट्रांवर बंदी घातल्याचे कुवतेकडून सांगण्यात येत आहे.

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
United Nations
इस्रायल-हमास युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रासंघाचा ठराव, भारत मात्र गैरहजर; नेमकं कारण काय?
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात