21 January 2021

News Flash

किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा

सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला

(संग्रहित छायाचित्र)

 

वादग्रस्त संसदीय निवडणुकीनंतर देशात उसळलेला क्षोभ संपुष्टात आणण्याचा प्रयत्न म्हणून किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी गुरुवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

सरकार समर्थक पक्षांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर देशात क्षोभ उसळला. मतांची खरेदी आणि अन्य गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.

त्यानंतर निदर्शकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला, काही कार्यालये लुटण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली. त्यानंतर विरोधकांनी जीनबेकॉव्ह यांना हटविण्याची आणि नवे सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:17 am

Web Title: kyrgyz president resigns abn 97
Next Stories
1 केंद्राची अखेर माघार!
2 बेकायदा बांधकामांबाबत महापालिकांचे मौन
3 शेत जाळल्यामुळे नव्हे, दिल्लीकरांमुळे प्रदूषण!
Just Now!
X