News Flash

LAC वर निर्माण झाली कोंडी, चीन बरोबर पुढच्या बैठकीची नाही खात्री

चार पैकी फक्त दोन ठिकाणाहून....

मागच्या काही दिवसांपासून तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूकडून वरिष्ठ सैन्य पातळीवर चर्चा सुरु होती. पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही.

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन बरोबर संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आता सैन्य माघारीची आणि सैनिक संख्या कमी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. तिथे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली असून तणावाची स्थिती ही दीर्घकाळ राहणार आहे. त्या दृष्टीने भारताने आपली तयारी सुरु केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

नियंत्रण रेषेजवळ चीनने जी, सैन्य तटबंदी उभी केली आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून भारताने सुद्धा आपले तितकेच सैनिक तैनात केले आहेत. या सैन्य तुकडयांना दीर्घकाळासाठी तिथेच ठेवण्याची भारतीय लष्कराची तयारी आहे.
१४ जुलैला क़ॉर्प्स कमांडर्समध्ये चौथ्या फेरीची चर्चा झाली. त्यानंतर सैन्य माघारीची कोणतीही हालचाल झालेली नाही. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने आले होते. त्यापैकी दोन ठिकाणी सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढच्या फेरीची चर्चा होईल की, नाही याबद्दल अनिश्चितता आहे असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा- चीन बरोबर तणाव, नौदलाच्या मिग-२९के फायटर विमानांची एअर फोर्सच्या तळावर तैनाती

गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४ आणि १५ वरुन दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १७ ए जवळ एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर दोन्ही देशांचे प्रत्येकी ५० सैनिक तैनात आहेत. पँगाँग टीएसओ सर्वात कळीचा मुद्दा आहे. चिनी सैन्य फिंगर ४ वरुन फिंगर ५ पर्यंत मागे सरकले आहे. पण त्यांनी पूर्वीप्रमाणे फिंगर ८ वर जावे अशी भारताची मागणी आहे. फिंगर ८ ते फिंगर ४ मध्ये चिनी सैन्याने बांधकाम सुद्धा केले आहे.

आणखी वाचा- चीनच्या सीमेवर आता ‘भारत’ ड्रोनद्वारे असणार अधिक बारकाईने लक्ष

नौदलाच्या मिग-२९के फायटर विमानांची एअर फोर्सच्या तळावर तैनाती
पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरु आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ४० पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत. त्यात १८ विमाने आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर तैनात आहेत. उर्वरित मिग-२९ के विमाने गोवा येथील नौदलाच्या बेसवर असतात.

ही मिग-२९ के विमाने मूळची रशियन बनावटीची आहेत. गोव्यातील नौदलाच्या बेसवरुन काही विमाने उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या तळावर हलवली आहेत. चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:34 pm

Web Title: lac army prepares for the long haul with china dmp 82
Next Stories
1 “अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहा”; फडणवीस यांना वाढदिवसाच्या ‘शाही’ शुभेच्छा
2 राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा
3 भारतात प्रथमच ‘या’ मुलीच्या प्रेमात पडले होते विन्स्टन चर्चिल
Just Now!
X