30 November 2020

News Flash

तुमच्यासाठी कायपण… भारतीय लष्कराला लडाखमधील गावकरी करत आहेत मदत

हिवाळ्यात थंडीच्या कालावधीमध्ये चीनबरोबरचा संघर्ष तापण्याची शक्यता

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : रॉयटर्स)

भारत-चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर संघर्ष अजून मिटलेला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) थंडीच्या दिवसात भारतीय लष्कराच्या जवानांना अतिथंड अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे. हा संघर्ष हिवाळ्यामध्येही सुरु राहण्याची शक्यता लक्षात येथे सैनिकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा निवाऱ्याची व्यवस्था एलएसीजवळ उभारण्यात आली आहे. अतिउंचीवरील प्रदेशास अनुकूल असा हा आधुनिक अधिवास (निवारा) आहे. थंडीच्या काळात चीनने कदाचित पुन्हा आगळिक केलीच तर या आधुनिक निवाऱ्यांचा सैनिकांना मोठा फायदा होणार आहे. एकीकडे भारत सरकारडून हे प्रयत्न होत असतानाच देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र जागता पाहरा देणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांसाठी आता या सीमा भागांमधील गावकरीही पुढे सरसावले आहेत. स्थानिकांकडून भारतीय लष्करासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवल्या जात आहे. गावकरी वाळवलेलं कोरडं पनीर मोठ्या मोठ्या पिशव्यांमध्ये भरुन सैनिकांसाठी पाठवत आहेत. स्थानिक भाषेमध्ये या पनीरला छुर्पे असं म्हणतात. हा पनीरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन्स असतात जे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तसेच हे पनीर अनेक महिने टीकून राहू शकते. त्यामुळे येणाऱ्या थंडीच्या कालावधीमध्येही या पनीरचा वापर करता येणार आहे.

याचबरोबर गावकरी जवानांना साग सारख्या पालेभाज्याही पाठवत आहेत. या भाज्या पाण्यामध्ये उकळून खाता येतात. याचप्रमाणे स्थानिकांमध्ये लोकप्रिय असणारी सत्तूची पावडरही सैनिकांना पाठवली जात असून ही पावडर पाण्यात उकळून त्याचा सूपसारखा वापर करता येतो. यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता मिळण्यास नक्कीच फायदा होईल. हे अन्न पदार्थ प्रामुख्याने उंच ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांना पाठवण्यात येत आहेत. थंडीच्या कालावधीमध्ये हे पदार्थ सैनिकांना रेडी टू इट प्रमाणे केवळ गरम पाण्यात उकळून खाता येतील असा या मागील उद्देश आहे. सप्टेंबरमध्येही स्थानिक गावकऱ्यांनी सैनिकांना खाण्याचे पदार्थ दिल्याचे वृत्त ‘द गार्डीयन’नं दिलं होतं.

चीनने लडाखला लागून असलेल्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात सैनिकांची जमवाजमव सुरु केली आहे. मागील महिन्याभरापासून येथे पिपल्स लिब्रेशन आर्मी म्हणजेच चिनी सैन्याकडून जवानांची जमवाजमव केली जात आहे. चीनने सीमा भागांमध्ये रस्त्यांचे बांधकाम सुरु केलं आहे. चीनने पेंगोंग तलाव ते फिंगर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांना जोडणाऱ्या रस्त्याची रुंदीही वाढवली आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये तातडीने सीमेवर मोठ्याप्रमाणात सैन्य पाठवण्याच्या हेतूने चीनने हे काम हाती घेतलं आहे.

अक्साई चीनमध्ये दिर्घकाळासाठी सैनिक तैनात ठेवण्याची तयारी चीनने केली असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. एकीकडे भारताबरोबरच चर्चांसाठी बैठका घेत दबाव बनवण्याचा चीनचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे लष्करी सुसज्जतेलाही चीनने प्राधान्य दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 11:28 am

Web Title: ladakh villagers collect food supply it to indian army scsg 91
Next Stories
1 मल्लिकार्जुन खरगेंचं काँग्रेस नेतृत्वाला समर्थन; म्हणाले, “ज्येष्ठ नेत्यांनी…”
2 ‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय
3 Coronavirus : देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला ९० लाखांचा टप्पा
Just Now!
X