News Flash

भाजप आमदाराला भिडणाऱ्या महिला आयपीएस आॅफिसरची भावनिक फेसबुक पोस्ट

'मेरे आँसूओंको मेरी कमजोरी ना समझना'

चारू निगम

आपल्या देशात उद्दाम नेत्यांची कमतरता नाही. स्वत: कायदे पायदळी तुडवणारे आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणवणारे काही नेते आपलं काम करत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर काही कारण नसताना दादागिरी करतात तेव्हा ते पाहून चीड उत्पन्न होते. कालच उत्तर प्रदेशमधल्या एका आमदाराच्या दादागिरीमुळे एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर त्या महिला अधिकाऱ्याने फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि तीही आता प्रसिद्ध झाली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी ‘मेरे आसुओंको मेरी कमजोरी न समझना’ असं म्हटलं आहे आणि त्यावेळी काय परिस्थिती होती हे सांगितलं आहे. वाचा चारू निगम यांची पोस्ट

परवा दुपारी कोईलवा गावातील स्थानिक परिसरात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्रीविरोधात आंदोलन करत होते. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने अवैध दारुविक्री राजरोस चालते, असा या स्थानिकांचा आक्षेप होता. त्यासाठी हे गावकरी आंदोलन करत असतानाच तणाव निर्माण झाला. यावेळी काही महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी लाठीमार केला. आंदोलकांनी आमच्यावर दगडफेक केल्यामुळे आम्हाला लाठीमार करावा लागला, असा दावा यावेळी पोलिसांनी केला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक आमदार डॉ. राधा मोहनदास अग्रवाल याठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी येथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी चारू निगम यांना असे काही झापले की चारू निगम यांना आपले अश्रू अनावर झाले

 


चारू निगम या २०१३च्या आयपीएस  तुकडीच्या अधिकारी असून त्या सध्या उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, सदर घटनेचा व्हिडिओ पाहता कालचा अनुभव चारू निगम यांच्यासाठी निश्चितच वाईट ठरला, असे म्हणावे लागेल. या व्हिडिओमध्ये अग्रवाल चारू निगम यांना झापताना दिसत आहेत. “मी तुमच्याशी बोलतंच नाहीये, तुम्ही मला काही सांगूच नका. तुम्ही एकदम शांत बसा, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,” असे राधामोहन अग्रवाल बोलताना दिसत आहेत. त्यावर चारू निगम यांनीदेखील अग्रवाल यांना प्रत्युत्तर दिले. मी येथील प्रमुख अधिकारी आहे, मी काय करतेय हे मला माहिती आहे, असे निगम यांनी म्हटले. हा सगळा प्रकार सुरू असतानाच चारू निगम यांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 4:10 pm

Web Title: lady ips officer charu nigam writes a facebook post
Next Stories
1 तणावात भर! उत्तर कोरियात अमेरिकी नागरिकाची चौकशी
2 Neet Question Paper leak: नीट पेपर फुटीप्रकरणी चौघांना अटक; ५ लाख रुपयांना पेपरची विक्री
3 कर्मचाऱ्यांनो, परदेश वाऱ्यांचे अहवाल द्या, पेट्रोलियम मंत्रालयाचा आदेश
Just Now!
X