भगवान श्रीकृष्णाविरोधात आपत्तीजनक पोस्ट केल्याप्रकरणी एका नामांकित वृत्तपत्रात कार्यरत असलेल्या एका महिला पत्रकाराला आपली नोकरी गमवावी लागली आहे. सृष्टी जसवाल असं या महिला पत्रकाराचं नाव असून भगवान श्रीकृष्णाविरोधात तिनं केलेल्या आक्षेपार्ह ट्विटनंतर हिंदुस्थान टाइम्सनं तिला निलंबित केलं आहे.

गौतम अग्रवाल यांनीदेखील महिला पत्रकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. “संबंधित पत्रकारानं भगवान श्रीकृष्णाबाबत आपत्तीजनक ट्विट करून हिंदूंच्या भावनांचा अनादर केला आहे. म्हणूनच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असं अग्रवाल म्हणाले. तसंच अग्रवाल यांनी संबंधित पत्रकाराच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर हिंदुस्थान टाईम्सनंदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. “सृष्टी जसवालनं तिच्या वैयक्तीक ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटचं हिंदुस्थान टाइम्स समर्थन करत नाही. तिला त्वरीत नोकरीवरून निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे,” अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सनं ट्विटरद्वारे दिली आहे.

हेही वाचा – हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप; #BoycottNetflix हॅशटॅग होतोय टॉप ट्रेंड