नरेंद्र मोदी कुठेही गेले, त्यांनी काहीही केले, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की ते जल्लाद, जल्लाद आणि जल्लादच आहेत, या शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी नरेंद्र मोदींवर टीका केली.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपसोबत आघाडी करण्यावरही त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, मुस्लिम व्यक्तीला बिहारचा मुख्यमंत्री करेन, असे म्हणणारे पासवान स्वतः जल्लाद मोदींसोबत गेले आहेत. असे करून त्यांनी स्वतःचाच घात केला आहे. गोध्रा दंगलींमुळे आपण कधीही भाजपसोबत आघाडी करणार नाही, असे पासवान मला सांगायचे. मात्र, त्यांनीच आता भाजपसोबत आघाडी केली आहे.
केवळ नैराश्य आणि दुःखातून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्यावर टीका करीत असल्याचेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.