राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव आणि जद(यू)चे नेते नितीशकुमार यांची अवस्था ‘भुले बिसरे गीत’ अशी झाली आहे, अशी टीका केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी केली आहे. राजद, जद(यू) आणि पूर्वीचा जनता परिवार एकत्र आला तरी त्याचा विशेष प्रभाव पडणार नाही, कारण जनतेने बराच काळ त्यांचा कारभार पाहून आता त्यांना नाकारले आहे, असेही रामकृपाल यादव यांनी म्हटले आहे. आपले अस्तित्व टिकविण्याचा हे नेते व्यर्थ प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या कारभाराची जनतेला चांगलीच जाणीव आहे, जनतेला नवे सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही, यापुढे ते कोणालाही फसवू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.