25 September 2020

News Flash

पटेल आरक्षणाला लालूंचा पाठिंबा

गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर करतानाच भाजप मागासविरोधी आणि सामाजिक न्यायविरोधी असल्याची टीका केली आहे.

| August 27, 2015 03:12 am

गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर करतानाच भाजप मागासविरोधी आणि सामाजिक न्यायविरोधी असल्याची टीका केली आहे.
गुजरातमधील पटेल आणि पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण तेच सामाजिक न्यायाचे मूळ आहे. त्यामुळे राजद त्यांच्यासमवेत असून एकत्रितपणे त्यांच्यासमवेत लढणार आहोत, असे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.
गुजरातमधील भाजपचे सरकार मागासवर्गीयांच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप मागासवर्गीय आणि सामाजिक न्यायविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. गरीब आणि तळागाळातील जनतेला आरक्षण देण्यास त्यांचा नेहमी विरोध राहिला आहे, असेही ते म्हणाले.
तथापि, आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमधील शहरांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याचे समर्थन करता येणार नाही. आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच झाले पाहिजे. गुजरातमधील जनता त्यांचा हक्क मागत आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 3:12 am

Web Title: lalu prasad supports patel reservation demand
टॅग Lalu Prasad Yadav
Next Stories
1 चीनच्या अध्यक्षांची अमेरिका भेट रद्द करण्याची मागणी फेटाळली
2 ‘एलईजे’चे २० दहशतवादी, चार पोलिसांना अटक
3 हल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन करा
Just Now!
X