News Flash

लालूंच्या मुलाची सुशील मोदींना धमकी; मुलाच्या लग्नात तोडफोडीचा दिला इशारा

पोलखोल करण्याची दिली धमकी

संग्रहित छायाचित्र

बिहारमधील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. राजकीय नेते आता एकमेकांना हाणामारीच्या धमक्या देत आहेत. मंगळवारी बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. मोदी यांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते बिहारमधील औरंगाबाद येथे एका सभेदरम्यान बोलत होते.

तेजप्रताप म्हणाले, ‘आपला मुलगा उत्कर्ष मोदी याच्या लग्नासाठी सुशील मोदींनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोनवरुन मोदी म्हणाले की, माझा माजी आरोग्य मंत्र्यांशी संपर्क करुन द्या. अशा प्रकारे खोचक बोलून माझा अपमान करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, त्यांच्या मुलाच्या लग्नातच आम्ही सर्व पाहुण्यांसमोर त्यांची पोलखोल करु. आमच्यातील लढाई सुरु असून आम्ही माघार घेणार नाही उलट, पलटवार करु. प्रसंगी आम्ही त्यांच्या घरात घुसून मारू, आम्ही आता थांबणार नाही. लग्नातच आम्ही सभा घेऊ, तोडफोड करु’ अशा शब्दांत तेजप्रताप यांनी मोदी यांना धमकी दिली आहे. आम्ही लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे स्पष्टवक्ते आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

सुशील मोदी यांच्या मुलाचे लग्न डिसेंबर महिन्यांत होणार आहे. अगदीच साधेपणाने हा लग्न समारंभ पार पाडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी बॅण्ड-बाजा देखील ते वाजवणार नाहीत. तसेच यावेळी कुठलाही भव्य लवाजमा असणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा जोर धरु लागली आहे.

दरम्यान, मंगळवारी राबडी देवी यांनी बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘जे लोक हात कापण्याची भाषा करीत आहेत, त्यांनी आपला गळा कापून घेण्याचीही तयारी ठेवावी’ असे त्या म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 9:27 pm

Web Title: lalu yadavs son tej pratap yadav attacks sushil modi and threats to beat at home
Next Stories
1 गुजरातमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित होऊ देणार नाही- रुपाणी
2 मुस्लिम मागासवर्गीय नसल्यानं आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही : सुब्रमण्यम स्वामी
3 Video: केंद्रीय मंत्र्यामुळे विमान उड्डाणाला उशीर; महिला प्रवाशाने मंत्र्याला सुनावले
Just Now!
X