News Flash

मणिपूरमध्ये दरड कोसळून २० ठार

पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले त्या घटनेची पुनरावृत्ती मणिपूरमधील जौपी परिसरात शनिवारी घडली आहे.

| August 2, 2015 06:14 am

पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले त्या घटनेची पुनरावृत्ती मणिपूरमधील जौपी परिसरात शनिवारी घडली आहे. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या चंडेल जिल्ह्य़ातील अत्यंत दुर्गम चौपी परिसरातील एक गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले असून या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची खबर मिळताच पोलीस आणि मदतकार्य पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. खंगजॉय विभागातील कुकी समाजाचे वर्चस्व असलेले जौमोल हे गाव दरड कोसळून गाडले गेले आहे. शेजारच्या गावातील नागरिक मदतकार्य करण्यास असमर्थ ठरले आहेत. सततच्या पावसामुळे ही घटना घडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 6:14 am

Web Title: land slide in manipur
टॅग : Manipur
Next Stories
1 भाजपची समाजात फूट पाडण्याची खेळी
2 संसद अधिवेशन कोंडी कायम
3 सिंगापूर स्वातंत्र्य दिन सोहळ्याला गीते यांची उपस्थिती
Just Now!
X