31 March 2020

News Flash

‘काश्मीरमधील दूरध्वनी सेवा पूर्ववत’

इंटरनेट, मोबाइलवरील बंदी मात्र कायम

इंटरनेट, मोबाइलवरील बंदी मात्र कायम

काश्मीरमधील परिस्थिती निवळत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, तेथील दूरसंचार र्निबध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याचे आणि बहुतांश ठिकाणच्या दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. परंतु बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा, खासगी दूरध्वनी, मोबाइल आणि इंटरनेट सेवा मात्र बंद आहेत.

काश्मीर खोऱ्यात शनिवारी कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे दूरसंचार माध्यमांवरील र्निबध शिथिल करण्यात आले. अनेक भागांतील दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. श्रीनगरसह आणखी काही दूरध्वनी केंद्रे शनिवारी सायंकाळी सुरळीत सुरू झाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. काही मोजके भाग वगळता इतर ठिकाणची दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, लाल चौक हा व्यापारी भाग आणि येथील प्रेस एन्क्लेव्ह या ठिकाणच्या दूरध्वनी सेवा तूर्त बंद राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा आणि खासगी दूरध्वनीसेवा, मोबाइल सेवा आणि इंटरनेट सेवाही तूर्त बंद राहील. काश्मीर खोऱ्याच्या बहुतांश भागांतील र्निबध हटविण्यात आले आहेत, मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दले तैनात राहणार आहेत.

काश्मीरचा ध्वज उतरवला

भारताच्या राष्ट्रध्वजासह फडकणारा जम्मू- काश्मीरचा ध्वज रविवारी तेथील सचिवालयावरून उतरवण्यात आला. जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तीन आठवडय़ांनी जम्मू-काश्मीरचा ध्वज उतरवण्यात आला. अनुच्छेद ३७०नुसार, जम्मू- काश्मीरला आपला स्वतंत्र ध्वज ठेवण्याची परवानगी  होती. लाल रंगाच्या या ध्वजावर पांढऱ्या रंगाच्या तीन उभ्या रेषा आणि पांढऱ्या रंगाचा एक नांगर होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 12:54 am

Web Title: landline services restored in kashmir mpg 94
Next Stories
1 जम्मू-काश्मीरच्या लोकांप्रमाणे आम्हालाही कठोर प्रशासनाच्या क्रूरतेचा परिचय आला – राहुल गांधी
2 बुलंदशहर झुंडबळी : पोलीस अधिकारी हत्याप्रकरणातील सात आरोपींना जामीन
3 छत्तीसगड : आठ लाखांचा इनाम असलेल्या नक्षलींच्या म्होरक्याचे आत्मसमर्पण
Just Now!
X