14 August 2020

News Flash

इराणच्या स्फोटामागे मिसाईल हल्ला?, सॅटेलाइट फोटो आले समोर

तेहरानमध्ये शुक्रवारी झाला होता स्फोट

इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी शक्तीशाली स्फोट झाला आहे. हा स्फोट मिसाईल तळावरुन केलेल्या हल्ल्यामुळे झाला आहे अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. या स्फोटाचे जे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत त्यावरुन हा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. तेहरान येथे शुक्रवारी  हा स्फोट झाला. हा स्फोट नेमका का झाला असेल याची कारणं शोधली जात आहेत. अशात  पूर्व पर्वतरांगांमधल्या छुप्या मिसाईल तळावरुन करण्यात आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इस्त्रायलने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.शुक्रवारी जेव्हा हा स्फोट झाला तेव्हापासूनच या स्फोटामागची कारणं शोधली जात आहेत.

तेहरानमध्ये शुक्रवारी झालेला स्फोट महाभयंकर असाच होता. हवेत आगीचे भले मोठे लोळ पाहण्यास मिळाले. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की अनेक घरांचे नुकसान झाले. खिडक्यांच्या काचा निखळून पडल्या. गॅस लीक झाल्याने हा स्फोट झाला असे कारण सुरुवातीला देण्यात आले होते. मात्र आता हा मिसाईल हल्ला आहे अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 11:35 pm

Web Title: large blast in iran came from suspected missile site satellite images show scj 81
Next Stories
1 पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू: न्याय दंडाधिकाऱ्यांना बडतर्फ करा, माजी न्यायमूर्तींची मागणी
2 UP Board 10th, 12th result : पुन्हा मुलींचीच बाजी, प्रथम आलेल्यांना एक लाख आणि लॅपटॉप
3 देशभरात पसरणाऱ्या करोनापुढे मोदी सरकारने हात टेकले -राहुल गांधी
Just Now!
X