05 March 2021

News Flash

काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट; तालिबान्यांकडून गोळीबार

काबूलमध्ये शुक्रवारी दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असतानाही अफगाणिस्तान पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीला अद्यापही त्याचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव

| May 25, 2013 02:17 am

काबूलमध्ये शुक्रवारी दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असतानाही अफगाणिस्तान पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीला अद्यापही त्याचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बॉम्बस्फोटांपाठोपाठ गोळीबारही सुरू झाल्याचे वृत्त आहे.
गुप्तचर यंत्रणेचे रुग्णालय असलेल्या परिसरात आणि अफगाणिस्तान नागरी संरक्षण दलाचे मुख्यालय याच परिसरात असून आम्ही या घटनेचा तपास करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भारतीय दूतावासाची इमारतही स्फोटांच्या घटनास्थळाच्या जवळच असून तिला कोणताही धोका पोहोचलेला नाही. दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बंदूकधाऱ्यांनी एका इमारतीत मोक्याच्या जाग्यांवर दबा धरला असून तालिबान्यांनी हा हल्ला केला आहे. प्रथम स्फोट घडवून त्यानंतर गोळीबार सुरू केला आहे. अफगाण नागरी संरक्षण दल आणि संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संघटनांची कार्यालये तेथे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2013 2:17 am

Web Title: large explosions gunfire in central kabul
टॅग : Bomb Blast
Next Stories
1 श्रीनगरमध्ये चकमकीत चार जवान शहीद
2 मद्यधुंद श्रीशांतचा ‘त्या’ रात्री प्रशिक्षकांसह सर्वांनाच शिवीगाळ
3 भारतीय वंशाचे श्रीनिवासन अमेरिकेच्या वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश
Just Now!
X