देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासात १,२७,५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी करोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. आतापर्यंत देशात २,८१,७५,०४४ करोना रुग्ण आढळले. तर यापैकी २,५९,४७,६२९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३,३१,८९५ रुग्णांचा करोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या देशात १८,९५,५२० करोना बाधित रुग्ण आहेत.

हेही वाचा – नदीत मृतदेह फेकताना दाखवले म्हणून चॅनलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही का? -सर्वोच्च न्यायायल

करोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१,६०,४६,६३८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.