News Flash

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ जणांना करोनाची लागण

देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक करोना रुग्ण बरे

देशात करोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासांत ३,४४,७७६ लोक या विषाणूचा पराभव करण्यात यशस्वी झाले आहेत. तर आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 10:19 am

Web Title: last 24 hours 3 lakh 43 thousand 144 new corona patients were found in country srk 94
Next Stories
1 मोदी सरकारची लसीकरणासाठी मोठी मोहीम; ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१७ कोटी लसींचे डोस होणार उपलब्ध
2 नेटकरी हळहळले! ‘लव यू जिंदगी’ म्हणत करोनाशी लढणाऱ्या महिलेचा मृत्यू; व्हिडिओ झाला होता व्हायरल
3 धक्कादायक! सरकारी रुग्णालयात करोना रुग्णावर बलात्कार; २४ तासांमध्ये मृत्यू
Just Now!
X