News Flash

भारतात गेल्या वर्षी प्राण्यांच्या १३० प्रजातींचा शोध

जगात गेल्या वर्षी प्रथमच भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिकांनी प्राण्यांच्या नवीन १३० प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यात काही न उडणारे पक्षी व माशांच्या १९ प्रजातींचा

| July 30, 2013 12:35 pm

भारतात गेल्या वर्षी प्राण्यांच्या १३० प्रजातींचा शोध

जगात गेल्या वर्षी प्रथमच भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या वैज्ञानिकांनी प्राण्यांच्या नवीन १३० प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यात काही न उडणारे पक्षी व माशांच्या १९ प्रजातींचा समावेश आहे.
भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संचालक के. व्यंकटरमण यांनी सांगितले, की गेल्या एक वर्षांत आम्ही १९ विभागांत प्राण्यांच्या १३३ नवीन प्रजाती शोधल्या आहेत. एकपेशीय सजीव ते मासे, खेकडे, पक्षी यांचा त्यात समावेश आहे. अंदमानच्या बृहत् निकोबार बेटावरील न उडणारा पक्षी हा त्यातील सर्वात महत्त्वाचा शोध आहे. प्राथमिक अभ्यासानुसार या पक्षाला उडता येत नाही. त्याचे वर्णन रॅलिना क्रेक असे केले गेले आहे. नवीन एकपेशीय सजीवांची नवी प्रजाती शोधून काढणे हा संशोधनाचा नेहमीचा प्रकार झाला, पण उडता न येणाऱ्या पक्ष्याचा शोध हा विशेष आहे. हा नवीन पक्षी असाधारण असून दुर्मिळही आहे.
प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेने शोधलेल्या या पक्ष्याला अजून नाव देण्यात आलेले नाही, पण वैज्ञानिकांना त्याचे छायाचित्र घेण्यात यश आले आहे. या प्रजातीच्या पक्ष्याला पकडून त्याचा अभ्यास करावा लागणार आहे असे व्यंकटरमण यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी उभयचर प्राण्यांच्या दोन, माशांच्या १९, सरिसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २, खेकडय़ांच्या २, कोळय़ांच्या चार, कीटकांच्या ६६, सूक्ष्मजीव, पाकोळय़ा, मृदुकाय प्राणी यांच्या काही प्रजाती शोधल्या आहेत. कोलकाता परिसरात रोगांचा प्रसार करणाऱ्या कीटकांच्या प्रजातीही सापडल्या आहेत.
 कोलकाता येथे कीटकांची एक, विशेष माशांच्या तीन, सागरी माशांची एक प्रजाती सापडली आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेला भारतात प्रथमच प्राण्यांच्या १०९ प्रजाती सापडल्या आहेत, त्यात प्रवाळांच्या ४२ प्रजातींचा समावेश आहे. या १०९ प्रजाती उर्वरित जगात आहेत, पण त्या भारतात अजूनपर्यंत सापडल्या नव्हत्या.
अंदमान व निकोबार बेटांवर प्रवाळांच्या ४२ प्रजाती सापडल्या आहेत. त्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आग्नेय आशिया, तांबडा समुद्र, भारत-पॅसिफिक विभाग व इतर देशांत यापूर्वीच सापडल्या आहेत. भारताचा पूर्व किनारा, मन्नारचे आखात येथील जैवविविधता ही २००४च्या सुनामीमुळे कमी झाली होती ती या प्रवाळांमुळे वाढण्याची शक्यता आहे.
 पश्चिम बंगालमधील दिघा येथे माशांच्या दोन नवीन प्रजाती सापडल्या आहेत. त्या यापूर्वी थायलंड, ऑस्ट्रेलिया व जपानमध्ये सापडलेल्या आहेत. प्राण्यांच्या ज्या नवीन प्रजाती गेल्या वर्षी शोधल्या आहेत, त्या बघता भारतातील प्राण्यांच्या प्रजातींची संख्या ९२,२७९ झाली आहे, जी जगात १२.२७ लाख आहे.
 भारतात ईशान्य भाग जैवविविधतेत आघाडीवर आहे, तेथे प्राण्यांच्या अनेक प्रजाती अजून शोधल्या गेलेल्या नाहीत, असे सांगून व्यंकटरमण म्हणाले, की उत्तराखंडमधील जलप्रलयामुळे तेथील प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या असाव्यात.

प्राण्यांची दुनिया
जगातील प्राण्यांच्या प्रजाती- १२.२७ लाख
भारतात सापडलेल्या प्रजाती- ९२,२७९
ईशान्येकडील राज्ये, पश्चिम घाट, हिमालयाचा प्रदेश, मध्यप्रदेश व केरळातील अभयारण्ये, तामिळनाडू हे जैवविविधता असलेले भाग असून तेथे या प्रजाती सापडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2013 12:35 pm

Web Title: last year 130 new animal species discovered in india
Next Stories
1 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात वाळू माफियांचेच राज्य- दिग्विजय सिंग
2 भूगर्भ वायूच्या दरवाढीप्रकरणी नोटीस
3 पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच जादू
Just Now!
X