News Flash

सुवर्ण मंदिरात धरपकड

अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंग यांचे दिवाळीनिमित्त होणारे पारंपरिक भाषण बुधवारी कट्टरपंथींयांच्या आंदोलनामुळे बारगळले.

अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंग यांचे दिवाळीनिमित्त होणारे पारंपरिक भाषण बुधवारी कट्टरपंथींयांच्या आंदोलनामुळे बारगळले. इतकेच नव्हे तर कट्टरवाद्यांनी नेमलेले अकाल तख्ताचे समांतर जथेदार धियाँसिंग मांड यांनीच भाषण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सुवर्ण मंदिरातून अटक करण्यात आली. अनेक कट्टरपंथी कार्यकर्त्यांचीही धरपकड झाली आहे.  बिआंत सिंग हत्येतील जगतार सिंग हावरा याची कट्टरपंथीयांनी समांतर जथेदार म्हणून नेमणूक जाहीर केली आहे. हावरा तुरुंगात असल्याने मांड यांच्या हाती सूत्रे देण्यात आली आहेत.  या घडामोडींमुळे अमृतसरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:00 am

Web Title: law and order situation at golden temple
Next Stories
1 हॉटलाइनवर मोदी- ओबामा संवाद
2 ओबामांकडून मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा
3 ‘उल्फा’ संघटनेचा नेता अनूप चेतिया सीबीआयच्या ताब्यात
Just Now!
X