लोक जनशक्ती पार्टी (LJP) मध्ये राजकीय संकट आणखी तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी साधत आहेत. यात राष्ट्रीय जनता दल (RJD)ही मागे नाही. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी चिराग यांना NDA सोडून त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

यावेळी त्यांनी चिराग पासवान यांना २०१० मध्ये जेव्हा एलजेपी जवळ खासदार आणि आमदार नव्हते तेव्हा लालु प्रसाद यांनी रामविलास पासवान यांना मदत करत राज्य सभेत पाठविल्याचे लक्षात आणुन दिले.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

चिराग पासवान यांनी विचार करावा

तेजस्वी यादव म्हणाले, “चिराग पासवान यांनी विचार करावा की ते गुरु गोवालकरांच्या विचारांचे अनुसरण करणाऱ्यांबरोबरच राहतील की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकरांच्या अनुयायांसोबत जातील.”

नितीशकुमार यांच्यावर देखील साधला निशाणा

दरम्यान तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याववर देखील निशाणा साधला. तेजस्वी म्हणाले, “त्यांच्या अज्ञानामुळेच आज बिहार या परिस्थितीत आला आहे. राज्यात बेरोजगारी आणि दारिद्र्य आहे. २०१० मध्ये जेव्हा एलजेपीकडे कोणतेही खासदार आणि आमदार नव्हते तेव्हा लालूंनी त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

अडचणीच्या काळात भाजपची बघ्याची भूमिका- चिराग

लोकजनशक्ती पक्षातील संघर्षांत भाजपाने बघ्याची भूमिका घेतल्याने दुखावलो असल्याची प्रतिक्रिया खासदार चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे. हे संबंध असे एकतर्फी राहू शकत नाही. मला जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने सर्व पर्याय पडताळून पाहिले जातील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.