07 March 2021

News Flash

..त्यामुळे जेएनयूमध्ये डाव्या उमेदवारांचा विजय

किरण रिजिजू यांचे प्रतिपादन

| September 12, 2016 01:31 am

किरण रिजिजू

किरण रिजिजू यांचे प्रतिपादन

डाव्या नेत्यांनी ‘रोमँटिकीकरण’ केलेल्या अडगळीत टाकलेल्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांमुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला, असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले.

याउलट, दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जवळ करणारे विद्यार्थी ‘ताज्या मनाचे’ आणि ‘कालबाह्य़’ डाव्या विचारसरणीपासून संरक्षित असे आहेत, असेही रिजिजू म्हणाले.

राजधानी दिल्लीतील दोन मोठय़ा शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी संघटनांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. त्यावर रिजिजू यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उजव्या विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बाजूने कौल दिला, तर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी डाव्या आघाडीला विजय मिळवून दिला, असे सांगणाऱ्या एका वृत्तपत्राच्या मथळ्याचे छायाचित्रही रिजिजू यांनी ट्विटरवर टाकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:31 am

Web Title: left win in jnu polls victory of discarded ideology kiren rijiju
Next Stories
1 मल्याच्या मालमत्ता जप्तीसाठी ‘ईडी’ तिसरा आदेश काढण्याच्या तयारीत
2 मंगळावरील भूस्तरांची रंगीत छायाचित्रे
3 ऐतिहासिक छायाचित्रातील ‘तिचे’ अमेरिकेत ९२व्या वर्षी निधन
Just Now!
X