News Flash

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक पी. के. नायर यांचे निधन

१९६१ साली नायर हे 'एफटीआयआयम'ध्ये संशोधन सहाय्यक म्हणून रुजू झाले

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक पी. के. नायर यांचे निधन

‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’चे (एनएफएआय) संस्थापक पी. के. नायर यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर  यांनी त्यांचे संपूर्ण जीवन ‘एनएफएआय’साठी चित्रपटांचा संग्रह करून त्यांची जोपसना करण्यासाठी समर्पित केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
१९६१ साली नायर हे ‘एफटीआयआयम’ध्ये संशोधन सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९६४ साली ‘एनएफएआय’च्या स्थापनेत मोलाची कामगिरी बजावली. ‘एनएफएआय’मध्ये सहाय्यक क्युरेटर म्हणून १९६५ साली नायर यांची नियुक्ती करण्यात आली. १९९१ साली ते ‘एनएफएआय’च्या संचालक पदावरून निवृत्त झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 2:03 pm

Web Title: legendary film archivist p k nair passes away
Next Stories
1 काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला न्यायालयाचे समन्स
2 लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन
3 BLOG : देशाच्या सुरक्षेचा एनकाउंटर
Just Now!
X