News Flash

दुबईत पाहायला मिळणार ताजमहाल

दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली

आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ मुघल बादशहा शहाजहान यांनी ताजमहाल सारखी जगातील अप्रतिम कलाकृती बांधली. या वास्तूभोवती फिरणारी एक कथा ही जगजाहिर आहे. ताजमहाल सारखी दुसरी वास्तू जगात कुठेच बनू नये म्हणून त्यांनी या सगळ्या कारागीरांचे हात कापले होते. त्यामुळे जगात ताजसारखी हूबेहूब दुसरी सुंदर वास्तू बनलीच नाही. पण आता ताजमहालची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. आणि ताजची ही प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली. लेगो लँडमध्ये हे थिम पार्क असून त्यामध्ये जगातील प्रसिद्ध आणि जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या अनेक वास्तूंच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. एका छताखाली जगभरातील आश्चर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत असते, त्यामुळे हे थिम पार्क पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. जगभरात डेन्मार्क, फ्लोरिडा, मलेशिया, कॅलिफोर्निया, जर्मनी अशा अनेक ठिकाणी हे थिम पार्क आहे. भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनादिवशी ताज महालची ही प्रतिकृती लेगोलँडने जगासमोर आणली. जवळपास साडेसहाशे किलो वजनाची ही प्रतिकृती आहे आणि ६० लाखांहून अधिक विटांचा वापर करून लेगो कंपनीने ही ताजमहालची प्रतिकृती बनवली आहे. जवळपास दोन हजार तासांहूनही अधिक काळ ही प्रतिकृती बनवण्यासाठी लागला. मात्र ही प्रतिकृती प्रत्यक्षात जाऊन पाहण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे, कारण ऑक्टोबर महिन्यात हे थिम पार्क खुले करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 10:28 pm

Web Title: legoland dubai recreates the wonder of taj mahal
Next Stories
1 ‘दिल्लीत यंदा दारूचे एकही नवे दुकान उघडू देणार नाही’
2 भाजप खासदाराने पीओकेमध्ये केली लोकसभेच्या जागेची मागणी
3 पुरोहित आसामचे तर हेपतुल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी
Just Now!
X