News Flash

VIDEO: गुजरात विधानसभेत घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद

सचिवालयात मुख्यमंत्र्यांशिवाय सर्व मंत्र्यांचे कार्यालय आहे. ज्या इमारतीत बिबट्या घुसला ती इमारत सचिवालयाची मुख्य इमारत आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

गुजरात विधानसभा सचिवालयात रविवारी रात्री उशिरा एक बिबट्या घुसला. वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बिबट्या पकडण्यासाठी अभियान राबवले. यादरम्यान सचिवालय बंद ठेवण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी बिबट्या सचिवालयात घुसल्याचे दिसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अत्यंत संवेदनशील आहे. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मोठ्या महत्प्रयासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात संयुक्त पथकाला यश आले.

सचिवालयात मुख्यमंत्र्यांशिवाय सर्व मंत्र्यांचे कार्यालय आहे. ज्या इमारतीत बिबट्या घुसला ती इमारत सचिवालयाची मुख्य इमारत आहे. यादरम्यान पोलिसांनी विधानसभेतील सर्व मार्ग बंद केले होते. विधानसभेच्या बाहेर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. हे संयुक्त ऑपरेशन संपेपर्यंत आत जाण्याची कोणालाच परवानगी देण्यात आली नाही.

दरम्यान, सर्वांच्या सुरक्षिततेला महत्व दिले जात असल्याचे पोलीस अधीक्षक मयूर चावला यांनी सांगितले. जोपर्यंत बिबट्या पकडला गेला आहे किंवा तेथून निघून गेला असल्याचे निश्चित होत नाही. तोपर्यंत कोणालाच आत जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 11:20 am

Web Title: leopard entered secretariat premises in gujarats gandhinagar
Next Stories
1 आरबीआय विरुद्ध केंद्र सरकार! नेहरुंच १९५७ मधील पत्र ठरणार मोदी सरकारचं अस्त्र
2 १६ वर्षांनंतर पाकिस्तानी कैद्याची वाराणसीतील तुरुंगातून सुटका, आठवण म्हणून सोबत नेली भगवदगीता
3 ओदिशात चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान
Just Now!
X