दिल्लीतील सामूहिक बलात्कार व नंतर मुलीची झालेली हत्या यावर  आधारित ‘इंडियाज डॉटर’ या वृत्तपटावर बंदी घालून भारताने आंतरराष्ट्रीय आत्महत्याच केली आहे, अशी टीका या वृत्तपटाच्या दिग्दर्शक लेस्ली उदविन यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, की ‘इंडियाज डॉटर’ हा वृत्तपट म्हणजे भारताला एक सदिच्छापर भेट होती, पण भारताने त्याचा चुकीचा अर्थ लावला व त्यामुळे आता सगळय़ांची बोटे भारताकडे आहेत.या वृत्तपटाची प्रशंसा न करता उलट त्यावर बंदी घालण्यात आली. हा वृत्तपट दाखवल्याने पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्यास सुरुवात झाली असती, असा दावा उद्विन यांनी केला.
दरम्यान, वृत्तपटावर बंदी घालण्यात आल्याचा निषेध नोंदविण्यासाठी ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने आपले प्रसारण तासभर बंद ठेवले होते. यामुळे प्रेक्षकांना वाहिनीवरील कार्यक्रम बघता आले नाहीत.