लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अब्दुल करीम टुण्डा याला येथील न्यायालयाने १९९७ मधील विविध बॉम्बस्फोटप्रकरणी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाकिस्तानी नागरिकांना भारतात घुसण्यासाठी टुण्डा सहकार्य करीत असे, त्याचप्रमाणे तो बॉम्ब तयार करण्यातही वाकबगार आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने टुण्डा याला मुख्य महानगर दंडाधिकारी अमित बन्सल यांच्यासमोर हजर केले आणि अधिक चौकशीसाठी १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.